२४ तास आपत्कालीन सेवा: 07588 544 786
ज़िशान हॉस्पिटलमनियार · सोलापूरEnglishकॉल करा 07588 544 786
जागतिक दमा दिन, ५ मे २०२६

दररोज मोकळा श्वास घ्या: दम्याबद्दल गैरसमज आणि तथ्ये

दमा हा फुफ्फुसातील श्वसनमार्गांवर परिणाम करणारा दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये श्वसनमार्गांची सूज व श्वसनमार्ग अरुंद होणे, अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात. ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण होते. लवकर ओळखा आणि नियंत्रण मिळवा.

लक्षणे

  • धाप लागणे
  • घरघर आवाज येणे
  • खोकला
  • छातीत घट्टपणा

दम्याबद्दल गैरसमज आणि तथ्ये

  1. गैरसमज: दमा गंभीर नाही.

    तथ्य: दम्यावर नियंत्रण मिळवलं नाही, तर तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी योग्य उपचार आवश्यक आहेत.

  2. गैरसमज: लक्षणे सुधारल्यानंतर तुम्ही दम्यावरील उपचार थांबवू शकता.

    तथ्य: औषधोपचार थांबवल्यास दमा वाढू शकतो. औषधे थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  3. गैरसमज: दम्याची औषधे फक्त अटॅक आल्यावरच घ्यावी लागतात.

    तथ्य: अनेक लोकांना अटॅक टाळण्यासाठी दररोज औषधे घ्यावी लागतात. डॉक्टरांचा सल्ला पाळा.

प्रतिबंध आणि व्यवस्थापन

दमा बरा करता येत नाही, पण तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता:

  • आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवा.
  • प्रदूषण टाळा.
  • निरोगी जीवनशैली पाळा.
  • नियमितपणे औषधोपचार करा.

योग्य प्रकारे उपचार न केल्यास दमा श्वसनमार्गांना कायमचे नुकसान करू शकतो. लवकर उपचार आणि नियंत्रण यामुळे हा त्रास टाळता येतो.

जागतिक दमा दिनानिमित्त, चला निरोगी भविष्यासाठी एक मोकळा श्वास घेऊया.

हा संदेश फक्त रुग्ण जागृतीसाठी आहे. तो तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याची जागा घेत नाही. उपचारांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.

पत्रकात वापरलेले संदर्भ
  1. Mortimer K, Salvi SS, Reddel HK. Closing gaps in asthma care in India – World Asthma Day 2022. Indian J Med Res. 2022;156(1):6–9. PMID 36510892.
  2. Swarnakar R, Dhar R. Call to action: Addressing asthma diagnosis and treatment gaps in India. Lung India. 2024;41(3):209–216. PMID 38687232.
  3. US National Heart, Lung, and Blood Institute: Asthma. nhlbi.nih.gov/health/asthma
  4. Cleveland Clinic: Asthma. my.clevelandclinic.org/health/diseases/6424-asthma
  5. American Academy of Allergy, Asthma & Immunology: Asthma myths debunked.
  6. US National Heart, Lung, and Blood Institute: Living with asthma. nhlbi.nih.gov/health/asthma/living-with

श्वसनाचा त्रास? आम्हाला कॉल करा.

छाती रोगतज्ज्ञांसाठी वेळ घेण्यासाठी स्वागत कक्षाला कॉल करा. आपत्कालीन स्थितीत थेट रुग्णालयात या.

07588 544 786